संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्या नावाने ओळखला जातो, ज्यांचे फक्त नाव कानावर पडताच अंगावर शहारा (काटा) येतो, प्रत्येक मराठी माणसाच्या सळसळणाऱ्या रक्तामध्ये ताकद निर्माण होते ते नाव म्हणजे क्षत्रियकुलावतंस “छत्रपती शिवाजी महाराज”.
ज्या छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली, स्वराज्य रक्षणासाठी बलाढ्य शत्रुंना पळता भुई थोडी करून सोडली. शाहिस्ते खान, अफजल खान सारख्या क्रूर राक्षसांचा त्यांच्याच घरात घुसून खात्मा केला. अखंड भारत वर्षात ज्यांना रयतेचा राजा “जाणता राजा” म्हणून उपाधी मिळाली असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज.
महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मना मनात तसेच येथील मातीच्या कणाकणात ज्याच्या पराक्रमाची छाप उमटली आहे, प्रत्येक गड किल्ला छत्रपतींच्या पद्स्पर्श्याने पावन झाला आहे, असे असूनही याच पावन मातीमध्ये एक असेही ठिकाण आहे जिथे गेल्यावर साक्षात छत्रपतींचे दर्शन केल्याचा अनुभव येतो, संपूर्ण अंगामध्ये एक चमत्कारी ऊर्जा निर्माण होते एका अद्वितीय जगामध्ये प्रवेश केल्याचा भास होतो ते ठिकाण म्हणजे महाराजांच्या असंख्य किल्ल्यांपैकी एक परंतु लक्षणीय असा “सिंधुदुर्ग किल्ला”, होय हाच तो किल्ला जो संपूर्णपणे पाण्यामध्ये उभारण्यात आला आहे ज्याला जलदुर्ग असेही संबोधीत केले जाते याच पवित्र ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या पायाचा आणि उजव्या हाताचा ठसा पाहावयास मिळतो, प्रत्येक दिवशी हजारो शिवभक्त या ठिकाणी येऊन महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात, मालवण पासून काही अंतरावर या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली असून हा किल्ला संपूर्ण पाण्यामध्ये उभारण्यात आला आहे, ४ किलोमीटर च्या परिसरात या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले असून मजबूत तटबंदी केली गेली आहे, इतिहासात असेही नमूद करण्यात आले आहे कि जेव्हा या किल्ल्याचे काम सुरु होते तेव्हा महाराज स्वतः पाहणी करावयास आले असता ओल्या बांधकामावर महाराजांचा डावा पाय रुतला गेला तसेच तिथून पुढे जाताना त्यांनी एक ठिकाणी आपल्या उजव्या हाताने आधार घेतला अशा प्रकारे महाराजांच्या एका पायाचा आणि हाताचा ठसा उमटला गेला, बांदकाम करणाऱ्या व्यक्तींनी बहुदा दूरदृष्टी चा उपयोग करून या ठिकाणी घुमट बांधण्याचा निर्णय केला आणि एक अमूल्य भेट आपल्यासाठी जतन करून ठेवली. याच किल्ल्याबद्दल अशा अनेक वैशिष्ट्य पूर्ण गोष्टी आहेत ज्या आज देखील अभ्यासाचा विषय आहे. उदाहरणार्थ इतिहासामध्ये या किल्ल्याची निर्मिती करताना कोणती सामग्री किंवा पद्धती वापरली असेल, याच्या निर्मिती साठी किती वर्ष आणि खर्च झाला असेल याबद्दल आपण पुढील भागामध्ये जाणून घेऊयात धन्यवाद जय शिवराय.