Entertainment गरुड. -एक आदर्श पक्षी..

गरुड. -एक आदर्श पक्षी..

1922
0

गरुडाचे 7 गुणधर्म गरुडाला साखळी मध्ये सगळ्यात वरच्या स्थानावर घेऊन जाते.

1) गरुड कधीही कळप किंवा थव्या मध्ये राहत नाही. तो बाकीच्या पक्ष्यांमध्ये कधीही मिक्स होत नाही. गरुड कायम एकटे उंच आकाशात उडते जिथं बाकीच्या पक्ष्यांना उडणे तर सोडा साधे पोहचता सुद्धा येत नाही.

Advertisement

2) गरुडाची दूरदृष्टी आणि बुद्धिदृष्टी प्रचंड दूरची असते.
दुरूनच कोण शत्रू किंवा कोण भक्ष आहे हे भेदण्याची दृष्टी गरूडमध्ये असते.

3) गरुडाला वादळे आवडतात.
ज्या वादळात बाकीचे पक्षी शांत झाडावर बसतात किंवा कुठे तरी आसरा घेतात त्याच वादळात गरुड उंच झेप घेऊन त्या वादळांना जणू आव्हान देत असते.

4) सगळ्यात महत्वाचे म्हणजे गरुड दुसर्याने फेकलेले तुकडे किंवा आधीच मेलेलं भक्ष कधीही खात नाही. गरुडाचा स्वतःवर एवढा विश्वास असतो की तो स्वतःचे पोट किंवा स्वतःची प्रगती दुसऱ्याच्या तुकड्यावर कधीही भरत नाही.

5) गरुडाचे वैशिष्ठ म्हणजे तो आपला जोडीदार खरच योग्य आहे का नाही याची परीक्षा घेऊनच विश्वास ठेवतो.

6) गरुड स्वतःच्या मुलांना ही अश्याच पद्धतीने तयार करतो की ते कोणतेही आव्हान सहज पार करू शकतील परंतु चाटेगिरी किंवा फुकटेगिरी कधीही शिकवत नाही.

7) शेवटचे पण फार महत्वाचे जेव्हा गरुडाच्या पंखातील बळ कमी होते तेव्हा ते फार उंच टोकावरील पर्वतात आसरा घेऊन स्वताःचे पंख स्वतःच चोचेने उखडून फाडून काढतोे आणि नवीन पंख येण्याची वाट पाहतो.

एकदा का नवीन पंख परत आले की परत तोच दरारा घेऊन उंच उंच आकाशात भरारी मारतो.
परंतु या काळात तो कोणावरही अवलंबून राहत नाही किंवा जिवंत राहण्यासाठी कुणाचीही चाटेगिरी करत नाही.

याच वैशिष्टयेमुळे गरुड अन्नसाखळी मध्ये सगळ्यात वरच्या स्थानावर राहते.

जीवनात उच्च स्थान प्राप्त झालेल्या व्यक्तीही अश्याच प्रकारे गरुडाचे गुणधर्म पाळत आलेले असतात म्हणून ते त्या मानवी जीवनात उच्च स्थानावर विराजमान असतात.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here