History छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार नक्की कुठे आहे?

छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार नक्की कुठे आहे?

2812
0

जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त रयतेसाठी स्वराज्याची स्थापना करणारा आणि आपले राज्य हे फक्त रयतेसाठी चालवणारा राजा एकमेव राजा म्हणजे “छत्रपती शिवाजी महाराज” असा राजा जो रयतेच्या सुख दुःखात सहभागी होत असे, रयतेचे अश्रू म्हणजेच आपले अश्रू समजत असे, म्हणूनच छत्रपती शिवाजी राजांना “जाणता राजा” हि उपाधी देण्यात आली होती जो रयतेचे सुख दुःख जाणत असे, महाराजांच्या याच श्रेष्ठत्वामुळे रयत राजांसाठी आपले प्राण देण्यास हि तयार असत, राज्य म्हंटले कि त्यासोबत येते ती राजेशाही, मोठं मोठे, किल्ले,हवेली, आणि राज खजाना, ज्या खजान्यामध्ये अमूल्य असे हिरे, माणिक, मोती, हे सुद्धा तितकेच महत्वाचे असते, त्याचप्रमाणे अमूल्य असतात ती म्हणजे स्वराज्याची रक्षा करण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे, तलवारी, तोफा वगैरे वगैरे, कारण स्वराज्य टिकवण्यासाठी शत्रूसोबत युद्ध, सामना, करावे लागते आणि हे युद्ध एका शस्राशिवाय करणे असंभव असते, यापैकी सर्वात महत्वाचे शस्र म्हणजे तलवार.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात देखील महाराजांनी खूप लडाई जिंकल्या या लढाई जिंकण्यामागे मोलाचा वाटा होता तो म्हणजे राजांच्या तलवारीचा, अशा तलवारी ज्या आजवर चर्चेचा विषय राहिल्या आहेत, ज्यामध्ये “जगदंब” “तुळजा” आणि सर्वात प्रसिद्ध अशी “भवानी तलवार” इतिहासामध्ये खूप ठिकाणी भवानी तलवारीचा उल्लेख आल्याचे दिसून येते, तसेच हि तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजा भवानी मातेने दिल्याचे वर्णन देखील खूप ठिकाणी आहे .

Advertisement

परंतु या तलवारीचे सत्य खूप लोकांना माहित नाही ते म्हणजे सण १६५९ साली महाराज कोंकण च्या दौऱ्यावर असताना एका गावी विसावले, रयतेचा राजा आपल्या गावात आल्याचे ऐकताच कृष्णाजी सावंत यांनी राजांना एक तलवार त्यांच्या सन्मानार्थ सादर केली, हि तलवार कृष्णाजी यांचे वडील अंबाजी सावंत यांना एक पोर्तुगीज जहाजावर मिळाली होती, वजनाला एकदम हलकी जेमतेम १२०० ग्राम इतकी लांब पाते, घट्ट पकड आणि जीवघेणा वार करणारी हि तलवार पाहताक्षणी राजांच्या मनामध्ये घर करून गेली, हीच ती तलवार जिला राजांनी भवानी तलवार असे संबोधीत केले, कारण स्वराज्याच्या रक्षणासाठी अशा तलवारींची राजांना खूप गरज होती, पश्चिमेतल्या देशांकडून अशी तलवार मागवण्याचा राजांनी खूप प्रयत्न केला परंतु छत्रपतिंच्या पराक्रमामुळे राजांना अशी तलवार देणे राजकीय दृष्ट्या योग्य नाही असे समजून ब्रिटिशांनी तलवार देण्यास नकार दिला परंतु स्पेन च्या राज्याने छत्रपतींशी असलेल्या चांगल्या संबंधामुळे भवानी तलवारी प्रमाणेच कित्येक तलवारी देण्याचे मान्य केले, तसेच छत्रपतींसोबत झालेल्या या व्यवहारामुळे आनंदित होऊन स्पेनच्या राज्याने महाराजांसाठी रत्नजडित अशी एक तलवार भेट मनून दिली ती म्हणजे “जगदंब तलवार” हीच ती जगदंब तलवार जी ब्रिटिशांनी आपल्या देशात लुटून नेली जी आज लंडन च्या पेलेस मध्ये आहे, परंतु ज्या भवानी तालवारीबद्दल अनेक किस्से आहेत ती तलवार नक्की कुठे आहे हे अजूनही कोणाला माहित नाही   महाराजांच्या या तलवारीची त्याकाळी ३०० मन ( नाणी) देण्यात आली होती ज्यांची किंमत आज ७ करोड रुपये इतकी आहे म्हणूनच या तालवारीबद्दल प्रत्येक मराठी माणसाच्या मनात उत्सुकता आहे.

Advertisement
Previous articleगरुड. -एक आदर्श पक्षी..
Next articleArtificial Intelligence Plays a Major Role in The IoT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here